TEXT 35
sañjaya uvāca
etac chrutvā vacanaṁ keśavasya
kṛtāñjalir vepamānaḥ kirīṭī
namaskṛtvā bhūya evāha kṛṣṇaṁ
sa-gadgadaṁ bhīta-bhītaḥ praṇamya
सञ्जय: उवाच- संजय म्हणाला; एतत्-याप्रमाणे; श्रुत्वा-ऐकून; वचनम्-वचन; केशवस्य-श्रीकृष्णांचे; कृत-अञ्जलि:-हात जोडलेला; वेपमान:-थरथर कापणारा; किरीटी-अर्जुन; नमस्कृत्वा-नमस्कार करून; भूय:-पुन्हा; एव-सुद्धा; आह-म्हणाला; कृष्णम्-श्रीकृष्णांना; स-गद्गदम्-कंठ दाटून येऊन; भीत-भीतः-अत्यंत भयभीत झालेला; प्रणम्य-प्रणाम करून.
संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन्! भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणा-या अर्जुनाने हात जोडून पुनः पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला.
तात्पर्य: पूर्वी वर्णिल्याप्रमाणे, भगवंतांचे विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने गोंधळून गेला. त्याने पुनः पुन्हा श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि सद्गदित स्वराने, मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंतांची स्तुती करू लागला.