TEXT 33
yathā sarva-gataṁ saukṣmyād
ākāśaṁ nopalipyate
sarvatrāvasthito dehe
tathātmā nopalipyate
यथा-ज्याप्रमाणे; सर्व-गतम्-सर्वव्यापी; सौक्ष्म्यात्-सूक्ष्म असल्यामुळे; आकाशम्-आकाश; न-कधीच नाही; उपलिप्यते-लिप्त होते; सर्वत्र-सर्वत्र; अवस्थित:-स्थित झालेला; देहे देहामध्ये; तथा- म्हणून;आत्मा - आत्मा; न-कधीही नाही; उपलिप्यते- लिप्त होतो.
आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही.
तात्पर्य: वायू हा पाणी, चिखल, विष्ठा इत्यादी सर्व पदार्थात प्रवेश करतो; परंतु तो कशातही लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे जीव जरी विविध प्रकारच्या शरीरांमध्ये स्थित असला तरी, स्वत:च्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या शरीरांपासून अलिप्तच राहतो. म्हणून प्राकृत डोळ्यांनी, जीव या शरीराच्या संपर्कात कसा आहे आणि शरीराच्या विनाशानंतर तो कसा बाहेर जाती हे पाहणे अशक्यच आहे. कोणत्याही वैज्ञानिकाला हे सिद्ध करता येत नाही.