No edit permissions for मराठी
TEXT 25
tad ity anabhisandhāya
phalaṁ yajña-tapaḥ-kriyāḥ
dāna-kriyāś ca vividhāḥ
kriyante mokṣa-kāṅkṣibhiḥ
तत्-ते; इति-याप्रमाणे; अनभिसन्धाय-इच्छा न करता; फलम्-फळ; यज्ञा-यज्ञ; तपःआणि तप; क्रियाः-क्रिया; दान-दानाचे; क्रियाः-क्रिया; च-सुद्धा; विविधाः-विविध; क्रियन्ते--केल्या जातात; मोक्ष-काङ्क्षभिः-मुमुक्षूंद्वारे.
फळाची इच्छा न करता मनुष्याने 'तत्' शब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे.
तात्पर्य: आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत व्हावयाचे असल्याने व्यक्तीने भौतिक लाभासाठी कर्म करू नये. भगवद्धामाची प्राप्ती करण्याकरिताच कर्म केले पाहिजे.