No edit permissions for मराठी

TEXT 8

duḥkham ity eva yat karma
kāya-kleśa-bhayāt tyajet
sa kṛtvā rājasaṁ tyāgaṁ
naiva tyāga-phalaṁ labhet

दुःखम्-दुःखकारक; इति-असे एव-खचित; यत्-जे; कर्म-कर्म; काय-शरीराकरिता कलेश-क्लेश; भयात्-भीतीने; त्यजेत्-त्याग करतो; सः-तो; कृत्वा-करून; राजसम्‌-रजोगुणात; त्यागम्-त्याग; -नाही; एव-खचित; त्याग-त्याग; फलम्-फल; लभे- प्राप्त करतो.

जो मनुष्य, नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्याने रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते.

तात्पर्य: जो मनुष्य कृष्णभावनेत स्थित आहे त्याने सकाम कर्म करावे लागते या भीतीपोटी धनार्जन बंद करता कामा नये. कर्म करून जर एखाद्याला पैसे कृष्णभावनेत वापरता येत असतील किंवा सकाळी लौकर उठल्याने दिव्य कृष्णभावनेचा विकास करता येत असेल तर भीतीने अशी कायें न करण्याचे काहीच कारण नाही किंवा अशा कार्यांना कष्टप्रद समजायचे कारण नाही. अशा त्यागाला रजोगुणी समजण्यात येते. रजोगुणी कर्माचे फल नेहमीच क्लेशदायक असते. जर एखाद्याने त्या भावनेत कर्माचा त्याग केला तर त्याला त्यागाचे फळ कधीच लाभत नाही.

« Previous Next »