TEXT 28
yuñjann evaṁ sadātmānaṁ
yogī vigata-kalmaṣaḥ
sukhena brahma-saṁsparśam
atyantaṁ sukham aśnute
युञ्जन्-योगाभ्यासामध्ये युक्त होणे; एवम्-याप्रमाणे; सदा-नेहमी; आत्मानम्-आत्मा; योगी-योगी, जो परमात्म्याच्या संपर्कात आहे; विगत-पासून मुक्त; कल्मष:- कल्मष किंवा भौतिक दोष; सुखेन-दिव्य सुखामध्ये; ब्रह्म-संस्पर्शम्-ब्रह्माशी निरंतर संलग्न असलेला; अत्यन्तम्-परमोच्च; सुखम्-सुख; अश्नुते-प्राप्त करतो.
याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषांतून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये, परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो.
तात्पर्य: आत्मसाक्षात्कार म्हणजे भगवंतांशी संबंधित आपले वैधानिक स्वरूप जाणणे होय.जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची दिव्य सेवा करणे हेच त्याचे स्वरुप आहे. ब्रह्माशी असणार्या या दिव्य संबंधालाच ब्रह्म-संस्पर्श असे म्हटले जाते.