No edit permissions for मराठी

TEXT 17

teṣāṁ jñānī nitya-yukta
eka-bhaktir viśiṣyate
priyo hi jñānino ’tyartham
ahaṁ sa ca mama priyaḥ

तेषाम्-त्यांपैकी; ज्ञानी-पूर्ण ज्ञानी; नित्य-युक्तः-नित्ययुक्तः; एक-केवळः भक्तिः-भक्तीमध्ये; विशिष्यते-विशेष आहे; प्रियः -अत्यंत प्रिय; हि-निश्चितच; ज्ञानिनः-ज्ञानी व्यक्तीला; अत्यर्थम्-अत्यंत; अहम्-मी आहे; सः-तो; -सुद्धा; मम-मलाः प्रियः -अत्यंत प्रिय.

यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवद्भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे.

तात्पर्य: सर्व भौतिक कामनांच्या कल्मषांतून मुक्त झाल्यावर आर्त, जिज्ञासू, निर्धन आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध भक्त होऊ शकतात; परंतु त्यांपैकी, ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे आणि जो सर्व भौतिक इच्छांतून मुक्त झाला आहे तो खरोखरच विशुद्ध भगवद्भक्त होतो. या चार प्रकारच्या सुकृती लोकांपैकी जो भक्त पूर्ण ज्ञानी आहे आणि त्याचबरोबर भक्तीमध्ये युक्त आहे, तो भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वोत्तम आहे. ज्ञान प्राप्त केल्यावर मनुष्याला आपण आपल्या भौतिक शरीराहून भिन्न आहोत, याची अनुभूती होते आणि जेव्हा तो अधिक उन्नत होतो तेव्हा त्याला निर्विशेष ब्रह्म आणि परम सत्याचे ज्ञान होते. जेव्हा मनुष्य पूर्णपणे शुद्ध होतो तेव्हा आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत व हीच आपली स्वरूपस्थिती असल्याचा त्याला साक्षात्कार होतो. म्हणून शुदध भक्ताच्या संगतीमुळे जिज्ञासू, पीडित, भौतिक उन्नतीच्या मागे लागलेला आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध होतात. परंतु प्रारंभिक अवस्थेत ज्याला भगवंतांचे पूर्ण ज्ञान आहे आणि त्याचबरोबर जो भगवंतांची भक्तीपूर्ण सेवा करतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो. ज्याला भगवंतांच्या दिव्यतेचे शुद्ध ज्ञान झाले आहे तो भक्तियोगामुळे इतका सुरक्षित झालेला असतो की, त्याला सांसारिक दोष स्पर्शही करू शकत नाहीत.

« Previous Next »