No edit permissions for मराठी

TEXT 1

śrī-bhagavān uvāca
bhūya eva mahā-bāho
śṛṇu me paramaṁ vacaḥ
yat te ’haṁ prīyamāṇāya
vakṣyāmi hita-kāmyayā

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; भूय:-पुन्हा; एव-निश्चितपणे; महा-बाहो-हे महाबाहू, श्रृंणु-ऐक; मे-माझे; परमम्-परम, वचः-उपदेश, यत्-जे, ते-तुला, अहम्‌-मी; प्रीयमाणाय-आपला प्रिय मानून; वक्ष्यामि-सांगतो; हित-काम्यया-तुझ्या हितार्थ.

श्रीभगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना! पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुड़या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे.

तात्पर्य: भगवान् या शब्दाची व्याख्या पराशर मुनी पुढीलप्रमाणे करतात-जो बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या षड्ऐश्वर्यांनी पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात. जेव्हा श्रीकृष्ण या भूतलावर होते तेव्हा त्यांनी ही सर्व सहा ऐश्वर्ये प्रकट केली. म्हणून पराशर मुनींसारख्या महर्षींनी श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. आता श्रीकृष्ण, अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे आणि आपल्या कार्याचे अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करीत आहेत. यापूर्वी सातव्या अध्यायापासून भगवंतांनी आपल्या निरनिराळ्या शक्ती आणि त्या शक्ती कसे कार्य करतात याचे विवरण केले आहे. आता या अध्यायामध्ये भगवंत, अर्जुनाला अध्यायामध्ये त्यांनी आपल्या विविध शक्तींचे स्पष्ट वर्णन केले आहे. पुन्हा या अध्यायामध्ये ते अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्यांबद्दल सांगत आहेत.

          मनुष्य जितके भगवंतांबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो. मनुष्याने नेहमी भक्तांच्या सत्संगामध्ये भगवत्कथेचे श्रवण करावे. त्यामुळे त्याची भक्तिमार्गावरील श्रद्धा दृढ होईल. ज्यांना खरोखरीच कृष्णभावनाभावित होण्याची आस्था आहे अशाच लोकांमध्ये, भक्तांच्या सत्संगात भगवतकथा होऊ शकते. अशा कथांमध्ये इतर लोक सहभागी होऊ शकत नाहीत. भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की, तू मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला तुझ्या हितार्थ असे ज्ञान प्रदान करीत आहे.

« Previous Next »