No edit permissions for मराठी

TEXT 16

vaktum arhasy aśeṣeṇa
divyā hy ātma-vibhūtayaḥ
yābhir vibhūtibhir lokān
imāṁs tvaṁ vyāpya tiṣṭhasi

वतुम्-सांगण्यासाठी; अर्हसि-तुम्ही योग्य आहात; अशेषेण-सविस्तर; दिव्याः-दिव्य किंवा अलौकिक; हि-निश्चितच; आत्म-स्वत:च्या; विभूतय:-ऐश्वर्ये; याभिः-ज्याद्वारे; विभूतिभिः—ऐश्वर्ये; लोकान्-सर्वं ग्रहलोकः; इमान्-या; त्वम्-तुम्ही; व्याप्य-व्यापून; तिष्ठसि-स्थित आहात.

ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा.

तात्पर्य: या श्लोकावरून असे दिसून येते की, भगवान श्रीकृष्णांसंबंधी आपल्या ज्ञानाने अर्जुन संतुष्ट झालेला आहे. कृष्णकृपेने अर्जुनाकडे प्रत्यक्ष अनुभव, बुद्धी, ज्ञान या साधनांद्वारे इतर मनुष्यांना जे काही प्राप्त होऊ शकते ते सर्व काही होते आणि त्याने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणले होते. याबद्दल त्याला मुळीच संशय नव्हता. तरीही त्याने श्रीकृष्णांना त्यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करण्याची विनंती केली. सामान्य लोक आणि विशेषकरून निर्विशेषवादी लोक परम सत्याचे सर्वव्यापी रूप जाणण्यास उत्सुक असतात. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना विचारीत आहे की, आपल्या विभिन्न शक्तींद्वारे ते कसे सर्वत्र व्यापून राहिले आहेत. मनुष्याने जाणले पाहिजे की, सामान्यजनांच्या वतीने अर्जुन श्रीकृष्णांना पृच्छा करीत आहे.

« Previous Next »