No edit permissions for मराठी

TEXT 28

āyudhānām ahaṁ vajraṁ
dhenūnām asmi kāma-dhuk
prajanaś cāsmi kandarpaḥ
sarpāṇām asmi vāsukiḥ

आयुधानाम्-सर्व आयुधांमध्ये; अहम्-मी आहे; वजम्-वज; धेनूनाम्-गायीमध्ये; अस्मिमी आहे; काम-धुक्-सुरभी गाय; प्रजन:-प्रजोत्पादनाचे कारण;-आणि; अस्मि-मी आहे; कन्दर्प:-कामदेव; र्पांणाम्-सापाँमध्ये; अस्मि-मी आहे; वासुकिः-वासुकी.

सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे. प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव, मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे.

तात्पर्य: वज्र हे खरोखर शक्तिशाली शस्त्र आहे व ते श्रीकृष्णांच्या शक्तीचे प्रतीक आहे. परमव्योमातील कृष्णलोकामध्ये अशा गायी आहेत की ज्यांचे दुग्धदोहन केव्हाही करता येते आणि त्या गायी हवे तितके दूध देतात. अर्थात, अशा गायी भौतिक जगतामध्ये नाहीत, परंतु त्या कृष्णलोकामध्ये असल्याचा उल्लेख आढळतो. अशा गायींना सुरभि असे म्हटले जाते आणि भगवंत अशा अनंत गायंचे पालन करतात. कंदर्प म्हणजे चांगली संतती उत्पन्न करण्याकरिता कामवासना आहे आणि म्हणून कंदर्प हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे. कधी कधी केवळ इंद्रियतृप्तीकरिता मैथुन केले जाते; परंतु असे मैथुन हे श्रीकृष्णांचे प्रतीक असू शकत नाहीत. तथापि, चांगल्या प्रजोत्पादनासाठी केलेले मैथुन म्हणजे कंदर्प होय आणि ते श्रीकृष्णांचे प्रतीक आहे.

« Previous Next »