No edit permissions for मराठी

TEXT 32

sargāṇām ādir antaś ca
madhyaṁ caivāham arjuna
adhyātma-vidyā vidyānāṁ
vādaḥ pravadatām aham

सर्गाणाम्--सर्व सृजनाचा; आदिः-आदी; अन्तः-अंत; -आणि; मध्यम्-मध्य; — सुद्धा; एव-निश्चितपणे; अहम्-मी आहे; अर्जुन-हे अर्जुन; अध्यात्म-विद्या-अध्यात्मविद्या; विद्यानाम्-सर्व विद्यांमध्ये; वाद:-स्वाभाविक निष्कर्ष किंवा निर्णायक तत्व; प्रवदताम्-वादविवादामध्ये; अहम्-मी आहे.

हे अर्जुना! सर्व सृजनांचा आदी, अंत आणि मध्यही मीच आहे. सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे आणि तर्कशास्त्रींमध्ये निर्णायक सत्य मी आहे.

तात्पर्यः सृष्ट अभिव्यतींमध्ये सर्वप्रथम महत्तत्वाची निर्मिती होते. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे, भौतिक सृष्टीची निर्मिती आणि संचलन महाविष्णू, गभौंदकशायी विष्णू आणि क्षीरोदकशायी विष्णूंद्वारे केले जाते आणि शंकरांद्वारे या सृष्टीचा संहार केला जातो. ब्रह्मदेव हा दुय्यम निर्माता आहे. सृजन, पालन आणि संहार करणारे हे सर्व प्रतिनिधी म्हणजे भगवंतांच्या भौतिक गुणांचे अवतार आहेत. म्हणून भगवंत हेच संपूर्ण सृष्टीचे आदी, मध्य आणि अंत आहेत.

          प्रगत ज्ञान प्राप्त करण्याकरिता अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, उदाहरणार्थ चार वेद आणि त्यांचे सहा उपभाग, वेदान्त सूत्रे, तर्कग्रंथ, धर्मशास्त्रे आणि पुराणे इत्यादी. याप्रमाणे विद्यार्जन करण्यासाठी एकूण चौदा ग्रंथ आहेत. या ग्रंथांपैकी ज्या ग्रंथामध्ये अध्यात्मविद्या सांगण्यात आली आहे, त्यामध्ये विशेषकरून वेदान्तसूत्रे ही श्रीकृष्णांचे प्रतिनिधित्व करतात.

          नैय्यायिकांमध्ये विविध प्रकारचे युक्तिवाद असतात. स्वतःचा युक्तिवाद पटवून देण्यासाठी असे प्रमाण प्रस्तुत करणे की, जे विरुद्ध पक्षाच्या युक्तिवादाचेही समर्थन करते त्याला जल्प असे म्हटले जाते. विरोधी पक्षाचा केवळ पराभवच करण्याच्या दृष्टीने जो युक्तिवाद केला जातो त्याला वितंडा असे म्हटले जाते, परंतु वास्तविक निष्कर्षाला वाद असे म्हटले जाते. हे निर्णायक सत्य म्हणजेच श्रीकृष्णांचे रूप आहे.

« Previous Next »