No edit permissions for मराठी

TEXT 38

daṇḍo damayatām asmi
nītir asmi jigīṣatām
maunaṁ caivāsmi guhyānāṁ
jñānaṁ jñānavatām aham

दण्डः-दंड किंवा शिक्षा; दमयताम्-दमन करणा-या सर्व साधनांमध्ये; अस्मि-मी आहे; नीतिः-नीती; अस्मि-मी आहे; जिगीषताम्-विजयाची आकांक्षा करणा-यांमध्ये; मौनम्-मौन; -आणि; एव-सुद्धा; अस्मि-मी आहे; गुह्यानाम्-रहस्यांमध्ये; ज्ञानम्-ज्ञान;  ज्ञानवताम्-ज्ञानीजनांमध्ये; अहम्-मी आहे.

अराजकतेचे दमन करणा-या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि जे विजयेच्ळू आहेत त्यांची नीती मी आहे. रहस्यांमधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे.

तात्पर्य: दमन करणा-या अनेक शक्ती आहेत आणि अशा शक्तींपैकी ज्या दुष्टांचे दमन करतात त्या महत्वपूर्ण आहेत. दुष्टांना जेव्हा शिक्षा केली जाते तेव्हा त्या शिक्षेकरिता योजिलेला दंड हा श्रीकृष्णांचे रूप आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात जे विजयी होण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांमध्ये सर्वांत विजयी घटक म्हणजे नीती होय. श्रवण, स्मरण, ध्यान इत्यादी क्रियांमध्ये मौन हे महत्वपूर्ण आहे, कारण मौनामुळे मनुष्य शीघ्र प्रगती करू शकतो. जो पदार्थ आणि चेतन, भगवंतांची परा प्रकृती आणि अपरा प्रकृती, यांमधील भेद जाणू शकतो तो ज्ञानी मनुष्य होय. असे ज्ञान म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत.

« Previous Next »