No edit permissions for मराठी

TEXT 39

yac cāpi sarva-bhūtānāṁ
bījaṁ tad aham arjuna
na tad asti vinā yat syān
mayā bhūtaṁ carācaram

यत्-जे जे; -सुद्धा; अपि-असेल; सर्व-भूतानाम्-संपूर्ण सृष्टीमध्ये; बीजम्-बीज; तत्-ते; अहम्-मी आहे; अर्जुन-हे अर्जुन; -नाही; तत्-ते; अस्ति-आहे; विना-विना; यत्-जे; स्यात्-असेल; मया-मी; भूतम्-सृष्ट जीव; चर-अचरम्-चराचर.

तसेच हे अर्जुना! संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्याविना अस्तित्वात राहू शकत नाही.

तात्पर्य: प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि ते कारण किंवा बीज म्हणजे श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्णांच्या शक्तीविना काहीच अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना सर्वशक्तिमान म्हटले जाते. त्यांच्या शक्तीवाचून कोणतीही चराचर वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही. जे काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित नाही, तिला माया (जे अस्तित्वात नाही) असे म्हणतात.

« Previous Next »