No edit permissions for मराठी

TEXTS 6-7

mahā-bhūtāny ahaṅkāro
buddhir avyaktam eva ca
indriyāṇi daśaikaṁ ca
pañca cendriya-gocarāḥ

icchā dveṣaḥ sukhaṁ duḥkhaṁ
saṅghātaś cetanā dhṛtiḥ
etat kṣetraṁ samāsena
sa-vikāram udāhṛtam

महा-भूतानि-महाभूते; अहङ्कारः-मिथ्या अहंकार; बुद्धिः-बुद्धी; अव्यक्तम्-अव्यक्त; एव-- निश्चितपणे;-सुद्धा; इन्द्रियाणि-इंद्रिये; दश-एकम्-अकरा;-सुद्धा; पछ्त्र-पाच; -सुद्धा; इन्द्रिय-गो-चराः-इंद्रियविषय; इच्छा-इच्छा; द्वेष:-द्रेष; सुखम्-सुख; दुःखम्-दुःख; सङ्गतः-समूहः चेतना-चेतना, धृतिः-धैर्य; एतत्-हे सर्व; क्षेत्रम्-क्षेत्र; समासेन-संक्षेपाने; स-विकारम्—विकारांसहित; उदाहतम्—दृष्टातादाखल.

पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, दहा इंद्रिये आणि मन, पाच इंद्रियविषय, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते.

तात्पर्य: महर्षीच्या प्रमाणभूत विधानांवरून, वेद आणि वेदांतसूत्रे यावरून, या जगताचे घटक पुढीलप्रमाणे जाणता येतात. सर्वप्रथम पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत; मिथ्या अहंकार, बुद्धी, आणि अव्यक्त त्रिगुण आहेत; नेत्र, कान, नासिका, जिह्वा आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत; वाणी, पाय, हात, उपस्थ, गुदा ही पाच कर्मेंद्रिये आहेत; इंद्रियांचा स्वामी असणारे मन आहे आणि त्याला अंतरिंद्रिय म्हणतात. म्हणून मनासहित एकूण अकरा इंद्रिये आहेत. नंतर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच इंद्रियविषय आहेत. अशा रीतीने या चोवीस तत्वांच्या समूहाला क्षेत्र असे म्हणतात. जर मनुष्याने या चोवीस तत्वांचे पृथकरणात्मक अध्ययन केले तर तो क्षेत्राचे स्वरूप जाणू शकतो. त्यानंतर इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख हे स्थूल शरीरातील पंचमहाभूतांचे प्रतीक असणारे विकार आहेत. चेतना आणि ध्वनींद्वारे प्रतीत होणारी जीवन लक्षणे ही सूक्ष्म देहाची अर्थात मन, बुद्धी आणि अहंकार यांची प्रकटावस्था आहेत. या सूक्ष्म तत्त्वांचा समावेश क्षेत्रामध्ये होतो.

          पंचमहाभूते म्हणजे मिथ्या अहंकाराचे स्थूल प्रतीक आहे आणि मिथ्या अहंकार हा तामस प्रधान असे म्हटले जाते. तामस बुद्धी ही अव्यक्त त्रिगुणांचे प्रतीक आहे. प्रकृतीच्या अव्यक्त गुणांना प्रधान असे म्हटले जाते.

          ज्याला चीवस तत्वांचे विकारांसहित सखोल अध्ययन करावयाची इच्छा आहे त्यांनी तत्वज्ञानाचे अधिक विस्ताराने अध्ययन करावे. भगवद्गीतेमध्ये या तत्त्वांचे केवळ संक्षिप्त वर्णन आहे.

          शरीर हे या सर्व घटकांचे प्रतीक आहे आणि या शरीरामध्ये सहा स्थित्यंतरे होतात उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. म्हणून क्षेत्र हे अनित्य प्राकृतिक वस्तू आहे. तथापि, या क्षेत्राचा स्वामी क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे.

« Previous Next »