No edit permissions for मराठी

TEXT 11

sarva-dvāreṣu dehe ’smin
prakāśa upajāyate
jñānaṁ yadā tadā vidyād
vivṛddhaṁ sattvam ity uta

सर्व-द्वारेषु-सर्व द्वारांमध्ये; देहे अस्मिन्-या देहामध्ये; प्रकाशः-प्रकाशमय गुण; उपजायते- विकास पावतो; ज्ञानम्-ज्ञान; यदा-जेव्हा; तदा-त्या वेळी; विद्यात्-जाण; विवृद्धम्- वाढलेला किंवा वृद्धिंगत झालेला; सत्त्वम्-सत्त्वगुण; इति उत-असे म्हटले आहे.

जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्त्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो.

तात्पर्य: दोन नेत्र, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय आणि गुद अशी शरीरामध्ये नऊ द्वारे आहेत. जेव्हा प्रत्येक द्वार सत्वगुणाच्या लक्षणाने प्रकाशित होते तेव्हा मनुष्यात सत्वगुणाची वाढ झाली आहे असे समजावे. सत्वगुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थितीत पाहू शकतो, सर्व गोष्टी योग्य रीतीने ऐकू शकतो आणि सर्व गोष्टींची रुची यथार्थ रीतीने घेऊ शकतो. मनुष्य अंतर्बाह्य शुचिर्भूत होतो. प्रत्येक इंद्रियरूपी द्वारामध्ये सुखाची वृद्धी होते. हीच सत्त्वगुणाची अवस्था आहे.

« Previous Next »