No edit permissions for मराठी

TEXT 2

śrī-bhagavān uvāca
tri-vidhā bhavati śraddhā
dehināṁ sā svabhāva-jā
sāttvikī rājasī caiva
tāmasī ceti tāṁ śṛṇu

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; त्रि-विधा-तीन प्रकारच्या; भवति-होते; श्रद्धा-श्रद्धा; देहिनाम्-देहधारीची; सा-ती; स्व-भाव-जा-प्राकृतिक गुणांनुसार; सात्विकी-सत्वगुण; राजसी-रजोगुणी; -सुद्धा; एव-निश्चितपणे; तामसी-तमोगुणी; च-आणि; इति-याप्रमाणे; ताम्-ती; श्रृणु-माझ्याकडून ऐक.

श्रीभगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी तीन प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून ऐक.

तात्पर्य: जे शास्त्रविधींना जाणतात, परंतु सुस्तपणा किंवा आळशीपणामुळे जे या शास्त्रविधींचे पालन करणे सोडून देतात, त्यांचे नियंत्रण त्रिगुणांद्वारे केले जाते. जीवांना आपल्या सात्विक राजसिक किंवा तामसिक गुणांनी युक्त पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव प्राप्त होतो. जीवांचा प्राकृतिक गुणाशी असणारा संग अनादी काळापासून चालत आला आहे. जीव हा प्रकृतीच्या संपर्कात असल्यामुळे, त्याच्या विविध प्राकृतिक गुणांशी असलेल्या संगानुसार त्याला विविध प्रकारचे स्वभाव प्राप्त होतात. तथापि, मनुष्याने जर प्रमाणित आध्यात्मिक गुरूचा संग केला आणि शास्त्रविधींनुसार आचरण केले तर त्याचा स्वभाव बदलणे शक्य होते. हळूहळू तो तमोगुणापासून सात्विक गुणात अथवा रजोगुणापासून सात्विक गुणात उन्नत होऊ शकतो. निष्कर्ष हाच आहे की, एखाद्या विशिष्ट गुणातील अंधश्रद्धा मनुष्याला सिद्धावस्थेप्रत उन्नत करण्याला साहाय्यक होत नाही. म्हणून मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या संगतीत दक्षतेने आणि चातुर्याने सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. अशा रीतीने मनुष्य उच्चतर गुणात स्थित होऊ शकतो.

« Previous Next »