No edit permissions for मराठी

TEXT 10

na dveṣṭy akuśalaṁ karma
kuśale nānuṣajjate
tyāgī sattva-samāviṣṭo
medhāvī chinna-saṁśayaḥ

-नाही; द्वेष्टि-द्वेष करतो; अकुशलम्-अशुभ; कर्म-कर्म; कुशले-शुभ असणा-या; -नाही; अनुषज्जते-आसक्त होतो; त्यागी-त्याग करणारा; सत्त्व-सत्वगुणात; समाविष्टः-लीन; मेधावी-बुद्धिमान; छिन्न-कापून; संशयः-सर्वं संशय,

सत्त्वगुणात स्थित असलेला बुद्धिमान त्यागी, अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्मात आसक्त राहात नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतात.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित मनुष्य किंवा सत्त्वगुणी मनुष्य दुस-या कोणाचाही द्वेष करीत नाही अथवा त्याच्या शरीराला पीडा देणा-या कोणत्या वस्तूचाही द्वेष करीत नाही. तो योग्य स्थळी व योग्य काळी कर्म करतो व कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना भीत नाही. दिव्य स्तरावर स्थित असलेल्या अशा मनुष्याला सर्वांत बुद्धिमान व त्याच्या कार्यात संशयरहित समजले पाहिजे.

« Previous Next »