TEXT 37
yat tad agre viṣam iva
pariṇāme ’mṛtopamam
tat sukhaṁ sāttvikaṁ proktam
ātma-buddhi-prasāda-jam
यत्-जे; तत्-ते; अग्रे-प्रारंभी; विषम् इव-विषाप्रमाणे; परिणामे-शेवटी; अमृत-अमृत; उपमम्—तुलनेने; तत्—त्या; सुखम्-सुख; सात्त्विकम्-सात्विक; प्रोक्तम्—म्हटले आहे; आत्म-आत्म्यामध्ये; बुद्धि-बुद्धीच्या; प्रसाद-जम्—प्रसन्नतेपासून उत्पन्न.
जे आरंभी विषासमान प्रतीत होते, परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूपसाक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे.
तात्पर्य: आत्म-साक्षात्काराचा अभ्यास करीत असताना, मन आणि इंद्रिये संयमित करून, मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी मनुष्याला अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते ही सर्व विधिविधाने अत्यंत कठीण व विषाप्रमाणे कटू असतात. तथापि, अशा विधिविधानांचे पालन करण्यात जर मनुष्य यशस्वी झाला आणि दिव्य स्तरावर स्थित झाला तर तो खरे अमृतपान करण्यास प्रारंभ करतो आणि जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो.