No edit permissions for मराठी

TEXT 67

indriyāṇāṁ hi caratāṁ
yan mano ’nuvidhīyate
tad asya harati prajñāṁ
vāyur nāvam ivāmbhasi

इन्द्रियाणाम्- इंद्रियांच्या; हि-खचितच; चरताम्- भटकताना; यत्- ज्याच्याबरोबर; मन:- मन; अनुविधीयते- नेहमी गुंतलेले असते; तत् - ते; अस्य- त्याचे; हरति- हरण करते; प्रज्ञाम् - बुद्धी; वायू:-वायू; नावम्-नाव किंवा नौका; इव- प्रमाणे; अम्भसि- पाण्यावर.

ज्याप्रमाणे सोसाट्याचा वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्तत: ओढून नेली जाते त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते.

तात्पर्य : जोपर्यंत सर्व इंद्रिये भगवंतांच्या सेवेेमध्ये संलग्न होत नाहीत आणि जर त्यामधील एखादे इंद्रियही विषयभोगामध्ये रत असेल तर भक्ताला दिव्य प्रगतिपथावरून मार्गभ्रष्ट करू शकते. अंबरिष महाराजांच्या चरित्रात सांगतल्याप्रमाणे सर्व इंद्रिये कृष्णभावनेमध्ये निमग्न करणे अत्यावश्यक आहे, कारण मनाला नियंत्रित करण्याची तीच योग्य प्रक्रिया आहे.

« Previous Next »