No edit permissions for मराठी

TEXT 11

balaṁ balavatāṁ cāhaṁ
kāma-rāga-vivarjitam
dharmāviruddho bhūteṣu
kāmo ’smi bharatarṣabha

बलम्-बल; बल-वताम्-बलवानांचे; -आणि; अहम्-मी आहे; काम-काम, वासना; राग-आणि आसक्ती; विवर्जितम्-रहित; धर्म-अविरुद्धः-जो धर्माच्या तत्त्वाविरुद्ध नाही; भूतेषु-सर्व प्राणिमात्रांमधील; काम:-कामजीवन; अस्मि-मी आहे; भरत-ऋषभ-हे भरत श्रेष्ठ अर्जुना.

मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्तीरहित असते. हे भरतश्रेष्ठ अर्जुन! धर्मतत्त्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे.

तात्पर्य: बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे. त्याचप्रमाणे धर्मतत्त्वानुसार कामजीवन हे इंद्रियतृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्णभावनाभावितकरणे ही मातापित्याची जबाबदारी आहे.

« Previous Next »