No edit permissions for मराठी

TEXT 18

vistareṇātmano yogaṁ
vibhūtiṁ ca janārdana
bhūyaḥ kathaya tṛptir hi
śṛṇvato nāsti me ’mṛtam

विस्तरेण-विस्ताराने; आत्मन:-आपली; योगम्—योगशक्ती, विभूतिम्-ऐश्वर्ये; -सुद्धा; जन-अर्दन-नास्तिकांच्या हन्ता, हे जनार्दन; भूयः-पुन्हाः कथय-वर्णन करा; तृप्तिः—तृप्ती; हि-निश्चितच; शृण्वतः-श्रवण करीत असता; अस्ति-होत नाही; मे-माझीः अमृतम्— अमृत.

हे जनार्दन! कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते.

तात्पर्य: याच प्रकारचे निवेदन नैमिषारण्यातील शौनकआदी ऋषींनी सूत गोस्वामी यांना केले आहे.

वयं तु न वितृप्याम उत्तमश्लोकविक्रमे।
यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे ।।

‘‘मनुष्याने श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे जरी निरंतर श्रवण केले तरी त्याला कधीच कंटाळा येत नाही. श्रीकृष्णांचे उत्तम श्लोकांद्वारे स्तवन केले जाते. ज्यांनी श्रीकृष्णांशी दिव्य संबंध प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या लीलांच्या वर्णनाचे पदोपदी रसास्वादन करीत असतात.' (श्रीमद्भागवत १.१.१९) याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णांविषयी श्रवण करण्यास उत्सुक आहे आणि विशेषकरून ते कसे सर्वव्यापी आहेत, हे जाणून घेण्यात तो अधिक उत्सुक आहे.

          आता अमृतम् या शब्दाबद्दल विचार केल्यास, श्रीकृष्णांसंबंधीचे कोणतेही वर्णन अथवा उपदेश हा अमृततुल्य आहे आणि प्रत्यक्ष अनुभवाद्वारे या अमृताचे पान करता येते. आधुनिक कथा, कादंब-या आणि इतिहास व भगवंतांच्या अलौकिक लीला यांमध्ये फरक आहे, कारण या लौकिक कथा, गोष्टी आदी ऐकण्याने शेवटी कंटाळा येतो, परंतु कृष्णकथा श्रवण केल्याने कधीच कंटाळा येत नाही. याच कारणास्तव संपूर्ण जगाच्या इतिहासात भगवंतांच्या अवतारलीलांची अनेक वर्णने आहेत. पुराणे म्हणजे गतकाळातील इतिहास आहे आणि यामध्ये भगवंतांच्या विविध अवतारांच्या लीलांचे वर्णन करण्यात आले आहे. म्हणून असे वाचनीय साहित्य पुनः पुन्हा जरी वाचले तरी ते नेहमी ताजेतवानेच राहते.

« Previous Next »