No edit permissions for मराठी

TEXT 36

dyūtaṁ chalayatām asmi
tejas tejasvinām aham
jayo ’smi vyavasāyo ’smi
sattvaṁ sattvavatām aham

द्युतम्-द्युत; छलयताम्-सर्व फसविणा-यांमध्ये; अस्मि-मी आहे; तेजः-तेज; तेजस्विनाम्-सर्व तेजस्व्यांमध्ये; अहम्-मी आहे; जय:-विजय; अस्मि-मी आहे; व्यवसाय:-जोखीम अथवा साहस; अस्मि-मी आहे; सत्त्वम्-बल; सत्त्व-वताम्-बलवानांचे; अहम्-मी आहे.

फसविणा-यांमध्येही द्युत मी आहे आणि तेजस्व्यांचे तेज मी आहे, विजय मी आहे, साहस आणि बलवानांचे बलही मीच आहे.

 तात्पर्य: जगात अनेक प्रकारचे फसविणारे लोक आहेत. फसवणुकीच्या सर्व प्रकारांमध्ये द्युत किंवा जुगार सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णांचे रूप आहे. श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्यामुळे कोणत्याही साधारण मनुष्यांपेक्षा कपटी असू शकतात. श्रीकृष्णांनी एखाद्या माणसाला फसवायचे ठरविले तर फसवणुकीच्या बाबतीत कोणीही त्यांना मागे टाकू शकणार नाही. श्रीकृष्णांचा महिमा केवळ एकांगी नसून सर्वांगीण आहे.

     विजयशाली पुरुषांतील विजय श्रीकृष्ण आहेत. तेजस्वितांचे तेज श्रीकृष्ण आहेत. साहसी आणि उद्योगींमध्ये ते सर्वांत साहसी आणि उद्योगी आहेत. बलवानांमध्ये ते सर्वांत बलवान आहेत. जेव्हा श्रीकृष्ण या भूतलावर उपस्थित होते तेव्हा त्यांना बलशालीत्वाच्या बाबतीत कोणीही मागे टाकू शकत नव्हता. आपल्या बालपणातच त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता. द्युत, तेज, जय, साहस आणि बल याबाबतीत श्रीकृष्णांची बरोबरी कोणीच करू शकत नाही.

« Previous Next »