No edit permissions for मराठी

TEXT 41

yad yad vibhūtimat sattvaṁ
śrīmad ūrjitam eva vā
tat tad evāvagaccha tvaṁ
mama tejo-’ṁśa-sambhavam

यत् यत्- जे जे; विभूति-ऐश्वर्यः मत्-युक्तः सत्त्वम्-अस्तित्व; श्री-मत्-सुंदरः ऊर्जितम्-तेजस्वी; एव-निश्चितच; वा-किंवा; तत् तत्-ते सर्व, एव-निश्चितच, अवगच्छ-जाण, त्वम्-तू, मम-माइया; तेज:-तेजाचा; अंश-एक अंश, सम्भवम्-उत्पन्न झाले.

सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झाल्या आहेत हे तूजाण.

तात्पर्य: आध्यात्मिक अथवा भौतिक जगातील कोणतीही सुंदर किंवा तेजस्वी अभिव्यक्ती ही श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचा केवळ एक अंश असल्याचे जाणले पाहिजे. कोणतीही असामान्य ऐश्वर्यमय वस्तू श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचे रूप आहे असे समजले पाहिजे.

« Previous Next »