No edit permissions for मराठी

TEXT 42

atha vā bahunaitena
kiṁ jñātena tavārjuna
viṣṭabhyāham idaṁ kṛtsnam
ekāṁśena sthito jagat

अथ वा-अथवा, बहुना-अनेक, एतेन-या प्रकारे; किम्-काय; ज्ञातेन-जागून; तव-तुला; अर्जुन-हे अर्जुना; विष्टभ्य-व्यापून; अहम्-मी; इदम्-हे; कृत्स्नम्-संपूर्ण; एकएक; अंशेन-अंशाने; स्थितः-राहिलो आहे; जगत्-जगत.

परंतु हे अर्जुन! या सा-या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे.

तात्पर्य: भगवंत परमात्मारूपाने प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून, संपूर्ण प्राकृत सृष्टी व्यापून राहतात. भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात की, निरनिराळ्या वस्तू आपल्या निरनिराळ्या ऐश्वर्याने आणि वैभवाने कशा अस्तित्वात आहेत हे जाणण्यात काही अर्थ नाही. त्याने केवळ इतकेच जाणले पाहिजे की, श्रीकृष्णांनी प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मारूपाने प्रवेश केल्यामुळे सर्व वस्तू अस्तित्वात आहेत. सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेवापासून ते लहान मुंगीपर्यंत सर्व काही, भगवंतांनी प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून त्यांना धारण केल्यामुळे अस्तित्वात आहे.

          एक संस्था असा नेहमी प्रचार करते की, कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला परमध्येयाची, भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. परंतु या ठिकाणी देवतेच्या उपासनेला मुळीच ऐश्वर्याच्या केवळ एका अंशाचे प्रतिनिधित्व करतात. भगवंत हे प्रत्येक सृष्ट वस्तूचे उगम आहेत आणि त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. ते असमोर्ध्व आहेत, अर्थात त्यांच्याहून श्रेष्ठ किंवा त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही. पद्मपुराणात म्हटले आहे की, जो मनुष्य, भगवान श्रीकृष्णांना देवतासमान, मग ते ब्रह्मदेव असोत अथवा शंकर असोत, मानतो तो तात्काळ नास्तिक बनतो. तथापि, जर मनुष्याने श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विस्ताराचे आणि ऐश्वर्याच्या वर्णनाचे सखोल अध्ययन केले तर तो निःसंदेह श्रीकृष्णांचे स्वरूप जाणू शकतो, श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये आपले मन दृढपणे स्थिर करू शकतो. भगवंत आपल्या विभित्रांश विस्ताराद्वारे, परमात्मारूपाने, सर्व व्यापून राहतात, कारण परमात्मा अस्तित्वातील प्रत्येक वस्तूमध्ये प्रविष्ट होतो. म्हणून शुद्ध भक्त भक्तिभावाने, पूर्णपणे आपले मन कृष्णभावनेमध्ये एकाग्र करतात. यास्तव ते सदैव दिव्यावस्थेमध्ये स्थित असतात. या अध्यायातील आठव्या श्लोकापासून ते अकराव्या श्लोकापर्यंत कृष्णभक्ती आणि कृष्ण आराधना याचे स्पष्ट रीतीने निर्देशन करण्यात आले आहे. हाच शुद्ध भक्तीचा मार्ग आहे. या अध्यायामध्ये भक्तीची परमसंसिद्धी, भगवंतांचे सान्निध्य, कसे प्राप्त करता येते याचे वर्णन विशद रीतीने करण्यात आले आहे. गुरुशिष्य परंपरेतील महान आचार्य बलदेव विद्याभूषण या अध्यायावरील आपल्या भाष्याचा शेवट करताना म्हणतात की,

यच्छक्त्तिलेशात्सुर्याद्या भवन्त्यत्युग्रतेजस:
यदंशेन धृतं विश्र्वं स कृष्णो दशमेऽर्च्यते ।।

 भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीपासून तेजस्वी सूर्यसुद्धा आपली शक्ती प्राप्त करतो आणि श्रीकृष्णांच् विस्तारित रूपांद्वारे संपूर्ण जगताचे पालनपोषण होते म्हणून श्रीकृष्ण पूजनीय आहेत.

          या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘विभुतियोग’ या दहाव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous