No edit permissions for मराठी

TEXT 40

nānto ’sti mama divyānāṁ
vibhūtīnāṁ paran-tapa
eṣa tūddeśataḥ prokto
vibhūter vistaro mayā

-नाही; अन्तः-अंत; अस्ति-आहे; मम-माझ्या; दिव्यानाम्-दिव्य; विभूतीनाम्— विभूतींना; परन्तप-हे परंतपः एषः-या सर्व; तु-परंतु; उद्देशत:-उदाहरणरूपाने; प्रोत:- सांगितले; विभूते:-विभूतींचा; विस्तर:-विस्तार; मया-माझ्याद्वारे

हे परंतप माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे, ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे.

तात्पर्य: वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या शक्ती आणि ऐश्वर्यांना अनेक प्रकारे जाणण्यात आले तरी अशा ऐश्वर्यांना मुळीच अंत नाही. यास्तव सर्वच शक्ती आणि विभूतींचे वर्णन करणे शक्य नाही. अर्जुनाच्या जिज्ञासेचे समाधान करण्याकरिता केवळ काही उदाहरणे वर्णिली आहेत.

« Previous Next »