No edit permissions for मराठी

TEXT 7

etāṁ vibhūtiṁ yogaṁ ca
mama yo vetti tattvataḥ
so ’vikalpena yogena
yujyate nātra saṁśayaḥ

एताम्—या सर्व, विभूतिम्—ऐश्वर्य, योगम्—योगशक्ती; —सुद्धा; मम—माझ्या; यः—जो; वेत्ति-जाणतो; तत्त्वतः-तत्त्वतः; सः-तो; अविकल्पेन-निश्चितपणे, विकल्परहित; योगेन-भक्तियोगाने; युज्यते-युक्त होतो; -कधीच नाही; अत्र-यातः संशयः-संशय.

ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते, तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही.

तात्पर्य: आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर म्हणजे भगवंतांचे ज्ञान होय. जोपर्यंत मनुष्याला भगवंतांच्या विविध ऐश्वर्यासंबंधी पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत तो भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही. सामान्यपणे लोकांना माहीत असते की, परमेश्वर महान आहे, परंतु परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे त्याचे सविस्तर ज्ञान त्यांना नसते. या ठिकाणी हे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. परमेश्वर कसा सर्वश्रेष्ठ आहे हे जर मनुष्याला कळाले तर सहजच तो भगवंतांना शरण जातो आणि भगवद्भक्तीमध्ये संलग्न होतो. जेव्हा मनुष्य, भगवंतांचे ऐश्वर्य तत्वतः जाणतो तेव्हा भगवंतांना शरण जाण्यावाचून त्याला इतर कोणताही विकल्प राहात नाही. हे तत्वतः ज्ञान श्रीमद्‌भागवत, श्रीमद्‌भगवद्‌गीता आणि तत्सम शास्त्रांतील वर्णनापासून जाणता येते.

          या ब्रह्मांडांच्या संचलनासाठी अनेक देवदेवता सर्व लोकांमध्ये नियुक्त केलेल्या आहेत आणि त्यामध्ये, ब्रह्मदेव, शंकर, चतुष्कुमार आणि इतर प्रजापती हे प्रमुख आहेत. ब्रह्मांडातील प्रजेचे अनेक पूर्वज आहेत आणि या सर्व पूर्वजांचा जन्म भगवान श्रीकृष्णांपासून झाला. भगवान श्रीकृष्ण हे सर्व पूर्वजांचेही मूळ पूर्वज आहेत.

          भगवंतांच्या ऐश्वर्यापैकी ही काही ऐश्वर्ये आहेत. जेव्हा मनुष्याचा यांच्याविषयी दुढ विश्वास होतो तेव्हा मोठ्या श्रद्धेने आणि नि:संदेह होऊन तो श्रीकृष्णांचा स्वीकार करतो आणि भक्तीमध्ये युक्त होतो. भगवंतांच्या प्रेममयी भक्तीमध्ये गोडी वृद्धिंगत करण्यासाठी हे सर्व सविस्तर ज्ञान आवश्यक आहे. श्रीकृष्ण कसे महान आहेत हे जाणून घेण्यामध्ये मनुष्याने दुर्लक्ष करू नये, कारण श्रीकृष्णांचा महिमा जाणल्याने प्रामाणिकपणे भक्ती करण्याचा निश्चय निर्माण होतो,

« Previous Next »