TEXT 6
etad-yonīni bhūtāni
sarvāṇīty upadhāraya
ahaṁ kṛtsnasya jagataḥ
prabhavaḥ pralayas tathā
एतत्-या दोन प्रकृती; योनीनि-उगमस्थान, भूतानि-सृष्ट पदार्थ, सर्वाणि-सर्व, इतियाप्रमाणे;उपधारय-जाण; आहम्-मी; कृत्स्नस्य-संपूर्ण; जगतः-जगताच्या; प्रभवः-उत्पत्ती किंवा अभिव्यक्तीचा उगम; प्रलय:-प्रलय; तथा-आणि.
सर्व सृष्ट प्राणिमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पतिकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण.
तात्पर्य: अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतनतत्वाची निर्मिती आहे. चैतन्य हे सृष्टीचे मूळ आहे आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते. भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते. याउलट हे भौतिक जग, केवळ चेतनशक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झाले आहे. या भौतिक देहाचा विकास, देहामधील चेतनशक्तीच्या उपस्थितीमुळे होतो. लहान मूल हे बालपणापासून कौमार्यावस्थेत आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्थेत जाते, कारण त्या ठिकाणी पराशक्ती, अर्थात जीवात्मा उपस्थित असतो. त्याचप्रमाणे विराट विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास, परमात्मा श्रीविष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो. म्हणून या विराट विश्वाच्या निर्मितीकरिता एकत्रित येणा-या जड आणि चेतन शक्ती या मूलत: भगवंतांच्या दोन शक्ती आहेत आणि म्हणून भगवंत हे सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत. भगवंतांचा अंश असणारे जीव हे गगनचुंबी इमारत, मोठा कारखाना किंवा शहराच्या निर्मितीस कारणीभूत असू शकतील; परंतु ते विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाही. विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजेच परमात्मा कारणीभूत असतो. भगवान श्रीकृष्ण हेच सूक्ष्म जीव आणि परमात्म्याचे कारण आहेत. म्हणून ते सर्व कारणांचे कारण आहेत. याला कठोपनिषदात (२.२.१३) पुष्टी दिली आहे: नित्यो नित्यानां चेतनश्चेतनां